Welcome to Shivaji University History Confernce

Welcome to Shivaji University History Confernce

शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर

  शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेला २८ वर्ष पूर्ण झालेले आहेत. या २८ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये एकूण २४ अधिवेशने विविध महाविद्यालयात पार पडली. परिषदेचे २५ वे रौप्य महोत्सवी अधिवेशन शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिभागामध्ये संपन्न झाले. परिषदेचे आज एकूण जवळ जवळ ४०० सभासद आहेत. परिषदेच्या कामकाजाकरिता शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. » Read More...



संस्थेचे उद्देश आणि ध्येय

  1. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इतिहास प्राध्यापकांमध्ये ऐक्य, स्नेहभाव आणि इतिहास ज्ञानाची देवाण-घेवाण वाढवून शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक उद्दिष्ट पूर्तीसाठी त्यांना प्रवृत्त करणे.
  2. वार्षिक चर्चासत्र आयोजित करून सभासदांना संशोधनपर शोध निबंध सादर करण्यास प्रोत्साहन देणे.
  3. चर्चासत्रांत वाचलेल्या निवडक शोधनिबंधांचे संशोधन पत्रिके मार्फत संपादन आणि प्रकाशन करणे.
  4. वेळोवेळी परिसंवाद, प्रशिक्षण वर्ग, उद्बोधन अभ्यासक्रम इत्यादी उपक्रम घेणे.
  5. सभासद प्राध्यापकांच्या सततच्या अध्ययन प्रवृत्तीस प्रोत्साहन देणे. विषयांतील नवीन संशोधन कार्याची ओळख करून देणे.
  6. सभासद प्राध्यापकांच्या अध्यापनाचा दर्जा सुधारण्यास मदत करून, इतिहास विषयाच्या अध्यापनाच्या आधुनिक आणि प्रगत पद्धतींची माहिती करून देणे.
  7. सद्यस्थितीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक इत्यादी प्रश्नापासून आणि संस्थे व्यतिरिक्त इतर निवडणुकांपासून अलिप्त राहून इतिहास विषयाचे अध्ययन आणि संशोधन यास वाहून घेणे.
» Read More...

Latest News & Events

२६ वे वार्षिक अधिवेशन दि.१२/०२/२०२४
सहर्ष स्वागत !! शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर
कार्यकारिणी बैठक दिनांक ०५ जानेवारी २०२४