सहाय्यक प्राध्यापक, डी.आर. माने महाविद्यालय,
कागल
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेने नुकतेच रौप्य महोत्सवी अधिवेशन मोठ्या दिमाखात पार पाडले. इतिहास परिषदेने आपल्या कामकाजात अनेक सकारात्मक काळानुसार बदल केले. ही इतिहास परिषद उभी करण्यामध्ये आमच्या ज्येष्ठ गुरुवर्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. त्यांनी घालून दिलेल्या विचारांवर ही परिषद आजही भक्कमपणे उभी आहे. अशा या परिषदेचा खजिनदार होण्याचा मान मला मिळाला, याचे मी भाग्य समजतो. तसेच आज आपली इतिहास परिषदेची वेबसाईट तयार होत आहे.
या माध्यमातून आपली इतिहास परिषद जागतिक पातळीवर पोहोचत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. हे सर्व जे काही आज होत आहे ते आपल्या इतिहास परिषदेतील प्राध्यापकांच्या व इतिहास परिषदेच्या सदस्यांच्या एकसंघता व एकजुटीमुळे होत आहे. ही एकजूट अशीच कायम राहून उत्तरोत्तर या परिषदेची अशीच प्रगती होत जावो. हीच अपेक्षा.