श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे संकेतस्थळ विकसित होत आहे. याचा परिषदेचा सचिव म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे. २३ फेब्रुवारी १९९५ रोजी परिषदेची स्थापना धर्मादाय आयुक्तांकडे झाली असली तरी तत्पूर्वीच इतिहास परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली होती.सुरुवातीला मोजक्या सदस्यांवर परिषदेचे कामकाज सुरु झाले होते.परंतु अत्यंत अल्पावधीतच परिषदेने बाळसे धरले. अर्थात सुरुवातीला परिषदेला अनेक अडचणीना सामोरे जावे लागले.त्यासर्व अडचणीवर मात करीत परिषद नावा -रुपाला आली आहे.समाजात इतिहास विषयक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे. समाज सुदृढ होण्याच्यादृष्टीने ही साक्षरता खूप महत्वाची आहे. ही परिषदेच्या संस्थापकांची स्पष्ट भूमिका होती. ती आज फलद्रूप होताना दिसत आहे. परिषद मागील ३० वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे.
परिषदेचे महत्वाचे वैशिष्ठ्ये म्हणजे वार्षिक अधिवेशन आणि डॉ.अ.रा.कुलकर्णी स्मृती व्याखानमाला.शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील व अन्य ठिकाणच्या प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी वैचारिक मेजवानीच असते. इतिहासकार डॉ.अ.रा.कुलकर्णी यांचा आमच्या परिषदेशी विशेष ऋणानुबंध होता.त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावे नियमितपणे वार्षिक अधिवेशनादरम्यान व्याख्यान आयोजित केले जाते.
भविष्यात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्राबरोबर अन्यठिकाणी परिषदेचे कार्य करणे संकल्पित आहे. नजीकच्या काळात राज्याबाहेरही परिषदेचे अधिवेशन व्व्याखाने आयोजित करण्याचे नियोजन आहे. परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष व अन्य पदाधिकारी, सदस्य यांनी घालून दिलेल्या मार्गाने परिषदेला अधिकाधिक लौकिक प्राप्त करून देऊ.भविष्यातील संकल्प सर्व सदस्यांच्या सहकार्याने यशस्वी करू.आपले सहकार्य असतेच, ते असेच अखंडित राहील अशी अपेक्षा करतो.