Welcome to Shivaji University History Confernce

Aim

 

संस्थेचे उद्देश आणि ध्येय

  • शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इतिहास प्राध्यापकांमध्ये ऐक्य, स्नेहभाव आणि इतिहास ज्ञानाची देवाण-घेवाण वाढवून शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक उद्दिष्ट पूर्तीसाठी त्यांना प्रवृत्त करणे.
  • वार्षिक चर्चासत्र आयोजित करून सभासदांना संशोधनपर शोध निबंध सादर करण्यास प्रोत्साहन देणे.
  • चर्चासत्रांत वाचलेल्या निवडक शोधनिबंधांचे संशोधन पत्रिके मार्फत संपादन आणि प्रकाशन करणे.
  • वेळोवेळी परिसंवाद, प्रशिक्षण वर्ग, उद्बोधन अभ्यासक्रम इत्यादी उपक्रम घेणे.
  • सभासद प्राध्यापकांच्या सततच्या अध्ययन प्रवृत्तीस प्रोत्साहन देणे. विषयांतील नवीन संशोधन कार्याची ओळख करून देणे.
  • सभासद प्राध्यापकांच्या अध्यापनाचा दर्जा सुधारण्यास मदत करून, इतिहास विषयाच्या अध्यापनाच्या आधुनिक आणि प्रगत पद्धतींची माहिती करून देणे.
  • सद्यस्थितीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक इत्यादी प्रश्नापासून आणि संस्थे व्यतिरिक्त इतर निवडणुकांपासून अलिप्त राहून इतिहास विषयाचे अध्ययन आणि संशोधन यास वाहून घेणे.
  • सभासदांच्या सोयीसाठी इतिहास विषयाचे एक संशोधन केंद्र (ग्रंथालय आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त) सुरू करण्याचा प्रयत्न करणे.